पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदूर गावालगत दरवर्षी येणारी ऊसतोड कामगारांची मुले गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकीच्या मदतीने आणि पुण्यातील सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत आहेत
दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यातून ऊसतोड टोळ्या दौंड तालुक्यामध्ये ऊसतोडी साठी येतात त्यांच्यासोबत त्यांची मुले देखील येत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता अशातच कोरोनामुळे शाळा बंद असल्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण घेणे अवघड होते मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षिका रोहिणी लोखंडे यांनी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे
रोहिणी लोखंडे यांनी नांदूर भागात सर्वे करून त्यांना ऊसतोडीवाल्यांची २० मुले दिसली ही मुले औरंगाबाद ,
जळगाव,धुळे या जिल्ह्यातून आपल्या पालकांबरोबर आलेली होती. शिक्षिका लोखंडे यांनी स्वयंसेविका मायाताई गिरमे यांच्या मदतीने दोन महिने रात्रशाळा चालवली. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे online शिक्षण चालू केले. मात्र पालकांकडे आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल नसल्याने अक्षरमानव संस्थेच्या माध्यमातून ५ नवीन मोबाईल मिळवले.आणि त्यावर मुले अभ्यास करू लागले आहे.
रोहिणी लोखंडे या मुलांना अभ्यासाबरोबरच मोबाईलवर कार्टून,कविता,गाणी गोष्टी दाखवतात.यामुळे अभ्यासाबरोबरच मुलांचे मनोरंजन होऊ लागले आहे. पालक आता मुलांना फडात घेऊन जात नाहीत.दुपारी सर्व मुले दोन तासासाठी आनंदाने त्यांच्या सोबत येतं आहे आणि शिक्षणाचे ऑनलाईन धडे मोबाईल वर गिरवत आहे रोहिणी लोखंडे यांच्या सोबतीला त्यांच्या आणखी शिक्षिका असल्याने त्यांना मदत झाली आहे
0 Comments