-->

Ads

ढोंगी शासनाला जाग आल्या शिवाय शांत बसणार नाही - संतोष जोगदंडे वंचित बहुजन आघाडी ऊमरखेड तालुका अध्यक्ष

 ढोंगी शासनाला जाग आल्या शिवाय शांत बसणार नाही - संतोष जोगदंडे वंचित बहुजन आघाडी ऊमरखेड तालुका अध्यक्ष 

उमरखेड: (प्रतिनिधी) मागील वर्षी पासुन देशात व राज्यात चालू असलेल्या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे.लाखो लोकांना आपले रोजगार गमवावे लागले छोटे-मोठे व्यवसाय दिवाळखोरीत निघाले असतानाच केंद्र व राज्य शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे महागाईचा प्रचंड भडका उडाला असून जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला टेकले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने घरगुतीगॅस वाढ, भाजीपाला दर वाढ, पेट्रोल शंभराच्या वर गेले असून सुद्धा केंद्रातल्या भाजपा व राज्यातल्या  झोपलेल्या तीघाडी शासनाला सर्वसामान्य जनतेचे   काहीही देणेघेणे राहिलेले दिसत नसल्याने वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नायक एडवोकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यभर महागाईच्या विरोधात दिनांक 21 जून रोजीएक दिवशीय धरणेआंदोलन करण्याचा निर्णय घेतला


 त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडी ऊमरखेड तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालय उमरखेड येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संतोष जोगदंडे यांनी केंद्र व राज्य शासनाला इशारा देत असताना शासनाने वेळीच महागाई रोखली नाही तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी याहीपेक्षा प्रखर आंदोलन करून सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून झोपेचं सोंग घेतलेल्या शासनाला जाग आल्या शिवाय शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला

याप्रसंगी जिल्हा महासचिव प्रशांत विंकरे संबोधी गायकवाड ,निकेश गाडगे, मौलाना सय्यद हुसेन मौलाना शेख मदार अथर खतीब युवराज  बंडगर,राजाराम काकडे मिलिंद भरणे,देवानंद पाईकराव, चिंचोळकर शहर अध्यक्ष रि.सेना ,गजानन धोंगडे, विष्णुकांत वाडेकर,शिद्धार्थ धोंगडे,बंडगर ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते आंदोलनानंतर  उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

Post a Comment

0 Comments