-->

Ads

पिंपरी - चिंचवड शहरात एटीएम फोडणारी गॅंग पोलिसांच्या जाळ्यात

   पिंपरी -  चिंचवड शहरात येऊन शिताफीने  एटीएम फोडून चोरी करणाऱ्या गॅंग ला  भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी हरियाणातील आहे. सापळा रचून पोलिसांनी या टोळीला अटक केली.


 भोसरी पोलीस आरोपींचा मागोवा घेत थेट हरियाणा येथे जाऊन अटक केली. या टोळीतील तीन आरोपी अद्याप फरार आहे.आरोपींकडून आतापर्यंत  ट्रक, गॅस कटर,  दोन मेडिकल ऑक्सिजन  सिलेंडर, तीन कॅश ट्रे, दोन कोयते, तीन मोबाईल फोन, 22 लाख 95 हजार रोकरक्कम असा एकूण 26 लाख 33 हजार 360 रुपयांचा  मुद्देमाल जप्त केला.



या आरोपींनी भोसरी येथील पाजरपोळपरिसरातील  स्टेट बँक ऑफ इंडिया चे  एटीएम फोडले होते. यातील  22 लाख 95 हजार 600 रुपये लंपास केले. शौकीन अखतर खान, अकरम दिनमोहम्मद खान,  आणि अरसद आसमोहम्मद खान अशी या आरोपींची नावे आहेत.

 कृष्ण प्रकाश ( पोलिस आयुक्त ) 

Post a Comment

0 Comments