धावत्या मेल एक्सप्रेस गाडीत ते दोन चोरटे प्रवाशाच्या खिशातील महागडे मोबाईल करायचे गायब, गाडीतच चोरटा सापडला आणि
एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चोरट्यांकडून एक्सप्रेसमध्ये चोरीचे 11 मोबाईल पोलिसांनी हस्तगत करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पोलिस ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे त्यांचा शोध घेत आहेत जेणेकरुन त्यांना मोबाईल देता येईल
शुक्रवारी पहाटे मुंबईकडे येणा:या मंगला एक्सप्रेमधून प्रवास करणा:या सगीर अहमद यांचा मोबाईल अचानक चोरीस गेला. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांचा मोबाईल चोरीस गेला तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरु केली. ट्रेन सुरुच होती. महागडा मोबाईल चोरीस गेल्याने सगीर अहमद हे अस्वस्थ झाले. ही बाब त्यांनी अन्य सह प्रवाशांना सांगितली. प्रवाशांनी बोगीतच झाडा झडती सुरु केली. यावेळी एक संशयीत तरुण प्रवाशांच्या हाती लागला. सगीर अहमदसह अन्य प्रवाशांनी या संशयीत तरुणाला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. हसन शेख उर्फ अरबाज शेख असे या तरुणाचे नाव होते. या तरुणाला ताब्यात घेत कल्याण रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरु केली. अखेर सगीर अहमद यांचा चोरीस गेलेला महागडा मोबाईल हसन उर्फ अरबाजकडे सापडला.
या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांचे म्हणणो आहे की, पोलिसी खाक्या दाखविताच अरबाज याने कबूली दिली की, त्याचा एक अन्य साथीदार आहे. त्याच्यासोबत तो काम करतो. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य चोरट्याला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. त्याचे नाव तसलीम शेख असे आहे. हे दोघेही मिळून मुंब्रा येथेच राहतात. धक्कादाय म्हणजे या दोघांनी मिळून एक्सप्रेस गाडय़ातील प्रवाशांचे 11 मोबाईल लंपास केले होते. अजून फक्त चार प्रवाशांची नावे समोर आली आहेत. ज्यांचे मोबाईल चोरीस गेले होते. अन्य मोबाईल कोणाचे आहेत. त्याचा शोध पोलिसांनी सुरु आहे.
बाईट :- वाल्मिक शार्दूल ( वरिष्ठ पोलीस निरिक्षक)
0 Comments