-->

Ads

उमरखेड कृषी विभाग आत्माच्या शेतकरी गटामार्फत सोयाबीन बी.बी.एफ पद्धतीवर पेरणी

 तालुक्यातील मौजे अंबाळी  व कुपटी येथील शेतकऱ्यांना  कृषी विभाग आत्माच्या शेतकरी गटामार्फत सोयाबीन पिकाची बी. बी. एफ. पद्धतीने मारुती कवाने व दिगंबर चव्हाण रा.कुपटी यांच्या शेतावर पेरणी करण्यात आली

  

उमरखेड, दि, १८ याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री. श्रीरंग लिंबाळकर यांनी बी.बी.एफ .पद्धतिने पेरणीचे फायदे सांगितले. या पेरणी पद्धती मध्ये खते व बियाण्याची बचत होते.  चार ओळीनंतर सरी पडल्यामुळे सरीमध्ये जास्त पाणी झाले तर सरी वाटे पाणी निघून जाते व पावसामध्ये खंड पडला तर पाणी जमिनीत मुरून जलसंवर्धन होते व पावसाच्या खंडाच्या वेळेस ओल टिकून राहण्यास मदत होते व या ओलीचा पीक वाढीस फायदा होतो. हवा व सूर्यप्रकाश पिकांला भरपूर प्रमाणात मिळतो यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन सोयाबीन उत्पादनात वाढ होते तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थेत कीड रोग नियंत्रणासाठी चार ओळी नंतर चया  अंतरमधून मजुरास फवारणी करणे सोयीचे होते असे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले .तसेच मंडळ कृषी अधिकारी  श्री.सुनील देशपांडे यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया का करणे गरजेचे आहे व  कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री जी. एस .पेंटवाड यांनी सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धत वापरावी  व तूर ची टोकण पद्धतीने लागवड करावी तसेच आंतरपीक पद्धतीचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी आत्मा बी .टी. एम रत्नदीप धुळे, कृषी पर्यवेक्षक मंगलवाड, कृषी सहाय्यक आबाराव कदम, बळीराजा शेतकरी पुरुष बचत गट कुपटी गटा चे अध्यक्ष विष्णू कवाणे व गटातील सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments