-->

Ads

पहिल्या पावसाचा फटका; लोकल रद्द तर बस सेवेवरही परिणाम

 Mumbai Water Logging: दादर, सायन, माटुंगा, मानखुर्द, चेंबूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्यानं इथल्या सखल भागांत लगेचच पाणी साचलं आहे.



    मुंबई, 09 जूनः पावसानं पहिल्याच हजेरीत मुंबईकरांना (Mumbai) हैराण केलं. काही तासांतच सखल भागांमध्ये पाणी (Mumbai Rain) साचण्यास सुरुवात झाली. दादर, सायन, माटुंगा, मानखुर्द, चेंबूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्यानं इथल्या सखल भागांत लगेचच पाणी साचलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. अनेक ठिकाणी वाहतुकी कोंडी पाहायला मिळतेय. अशातच सायन रेल्वे स्थानकात पाणी भरलं आहे सायन (Sion Railway Station) स्थानकाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

    मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. चुनभट्टी रेल्वे स्टेशनवरही पाणी भरल्याने हार्बर लाईन ठप्प झाली आहे. रेल्वे रुळांवरच पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकही ठप्प झाली. कुर्ला ते सीएसएमटी रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

    पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लागला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. संततधार पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि CSMT या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 10 वाजेच्या सुमारास अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

    लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल

    02362 CSMT- आसनसोल विशेष गाडी – 14.30 Hrs(2 वाजून 30 मिनिटे)

    02598 CSMT- गोरखपूर विशेष गाडी- 15.30 Hrs (3 वाजून 30 मिनिटे)

    ट्रान्स हार्बर आणि BSU सेवा मात्र सुरळीत सुरु असून ठाणे आणि कर्जत-कसारा तसंच मानखुर्द- पनवेल दरम्यानची शटल सेवाही सुरु आहे.


    Post a Comment

    0 Comments