-->

Ads

फुलसांवगी पाणी पुरवठा पाईपलाईन चे भूमिपूजन ग्राम पंचायत च्या पाठपुराव्याला यश


रुद्राणी कन्ट्रक्शन कंपनी चा पुढाकार

फुलसांवगी येथे जुन्या पाईपलाईन च्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचा काम हाती घेण्यात आले आहे त्या कामाचे आज रीतसर भूमिपूजन करण्यात आले.

फुलसावंगी येथे निगणुर येथून पाणी पुरवठा केला जात होता. मागील वर्षी फुलसावंगी पाणी पुरवठ्या साठी गावा शेजारी स्वतंत्र विहीर उभारण्यात आली मात्र विहिरी पासून गावा पर्यंत ची पाईपलाईन जुनीच ठेवल्या गेली.


माहागाव प्रतिनिधी- संजय जाधव

एका अंदाजा नुसार जवळपास 50 वर्ष जुनी असलेली सिमेंट पाईपलाईन अतिशय जीर्ण झाली होती त्यामुळे वेळोवेळी पाईप लिकेज होत असे ज्यामुळे फुलसावंगी पाणी पुरवठ्यात

समस्या निर्माण होत होती. त्यातच हिमायतनगर माहूर राज्य महामार्गाचे काम सुरू आहे या कामाच्या खोदकाम दरम्यान तर ही समस्या अधिकच गंभीर झाली.हे काम रुद्राणी कन्ट्रक्शन कंपनी करीत आहे.ग्राम पंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी रुद्राणी कन्ट्रक्शन कंपनी च्या वरिष्ठ अधिकारी श्री पि.के. जाभंळे प्रोजेक्ट मॅनेजर व शेखर सुरोशे अधिकाऱ्यांना जुन्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून फुलसावंगी च्या विकासात खारीचा वाटा उचलण्यासाठी सतत पाठपुरावा केला.ग्राम पंचायत च्या मागणी कंपनीने मान्य केली गाव कुसा एक किमोमीटर बाहेरून येणाऱ्या कामावर कंपनीचे तबबल 13 लाख रुपये खर्च होणार असा अंदाज आहे

आज या पाईपलाईन कामाचे भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आले.भूमिपूजन शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते शेख मुस्ताक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच नवाब जानी, दिनेश नाईक, रवी पांडे, भगिरत नाईक, नरेंद्र शिंदे, कुणाल नाईक, गणेश भगत,इमरान पठाण,सोहेल खान यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments