-->

Ads

कल्याण डोंबिवली मध्ये बुलेटच्या कर्कश आवाजात धूम ठोकणाऱ्या व काळ्या काचा लावून मिरवणा-या गाडय़ांवर कल्याण वाहतूक पोलिसांची कारवाई

 कल्याण डोंबिवली मध्ये बुलेटच्या कर्कश आवाजात धूम ठोकणाऱ्या व काळ्या काचा लावून मिरवणा-या  गाडय़ांवर कल्याण वाहतूक पोलिसांची  कारवाई...

कल्याण पोलिसांनी बुलेट दुचाकीमध्ये मॉडीफाई सायलंन्सर लाऊन रस्त्यावर धूम ठोकत नागरीकांना त्रास देणाऱ्या व काळ्या काचा लावून मिरवणा-या  गाडय़ांवर
 कारवाई   मोहीम सुरू केली आहे मला तीन दिवसापासून पोलिसांनी 100 हून अधिक बुलेट गाड्यांवर कारवाई करत त्यांच्या सायलेन्सर जप्त केले असून गाडय़ांच्या काचेवर काळ्य़ा फिती लावणो बंदी असताना वाहन चालक काळ्य़ा फिती लावणाऱ्या अनेक गाड्यांवर  कारवाई केली आहे . वारंवार आव्हान करून कोणत्याच प्रकारे वाहनचलकांना प्रतिसाद मिळत नसल्याने


आज सकाळी वाहतूक पोलिसांची टीम कल्याणच्या प्रवेशद्वार असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात  कारवाई सुरू केली आहे विशेष म्हणजे या कारवाईमध्ये पोलिस व राजकीय नेत्यांच्या संबंधित लोकांच्या गाड्यांन काळ्या फीत असलेल्या  वाहतूक पोलिसांना मोठया प्रमाणात दबाव होत असून  कल्याण वाहतूक पोलीस दबाव येण्याच्या पूर्वीच कारवाई करत असल्याचे दिसून आले

Post a Comment

0 Comments