-->

Ads

फुलसांवगी येथे सोयाबीनच्या बियाण्याला बुरशी बोगस बियाण्यामुळे शेतकरी हवालदिल

महागाव प्रतिनिधी : संजय जाधव

फुलसावंगी ( दि१८) मृग नक्षत्र लागून आठ दिवस झाले पाऊसही रोज हजेरी लावत आहे
त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु आहे,बी- बियाणे, रासायनिक खते मिळेल त्या भावात खरेदी करून शेतकरी पेरणी च्या घाईत आहे,याचाच फायदा घेत काही बोगस बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना मातीत मिसळण्याची जणू काही विडाच उचलला आहे, आणि त्याला पूर्णपणे तालुका कृषी विभाग सहकार्य करत आहे,असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही
फुलसावंगीत आज मितीला १६ कृषी केंद्र आहेत परंतु पक्के कंप्युटराईस बिल क्वाचितच
एखाद्या कृषी केंद्र चालकाकडून देण्यात येते
तालुका कृषी अधिकारी मात्र या सर्वांशी मधुर संबंध ठेऊन आहेत शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास त्याची त्वरित दाखल घेतली जात नाही , तक्रार द्या तेही आवक जावंक मध्ये,मग त्याचा विचार केला जाईल, कृषी सहायक जाऊन चौकशी करून अहवाल सादर करेल,सर्व काही नियोजन बद्द,यात आरामात महिना दोन महिने जातात,शेतकरी जाऊन जाऊन जाईल कुठ पर्यंत या नीतीचा अवलंब तालूका कृषी अधिकाऱ्याकडून होत आहे,

पाच बॅग सोयाबीन घेतले होते त्या पैकी दोन बॅग बुरशीजन्य निघाल्या, त्या दोन बॅग परत केल्या, तक्रार वगैरे काही केली नाही, कधी कधी उधार खत, बियाणे घ्यावे लागते त्या मुळे तक्रार  केली नाही
        इकबाल पठाण
    शेतकरी,फुलसावंगी

            विजय मुकाडे
    तालुका कृषी अधिकारी,महागाव
मो नं----९४२१४५६७५२
नो रिस्पॉन्स, फोन उचलत नाहीत

प्रतिक्रिया

बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याचा आख्खा हंगाम वाया जातो, पहिले बियाणे उगवले नाही तर  कर्ज घेऊन दुबार पेरणी करावी लागते यात २०-२५ दिवस जातात, नंतर च्या पिकाला पाहिजे तसा उतारा येत नाही परिणामी उत्पन्नात घट होते,त्यामुळे शेतकरी कर्जा च्या दृस्ट चक्रातून सुटत नाही आणि आत्मघाता सारखा टोकाचा निर्णय घेतो,  हे कुठेतरी थांबायलाया हवं  ,बोगस बियाणे विक्रीला तालुका कृषी अधिकाऱ्याचा छुपा पाठींबा आहे,आणि तेच सर्वोसर्व जबाबदार आहेत--–-------
        शिवानंद नाईक
       युवा जिल्हाध्यक्ष,  स्वाभिमानी शेतकरी संघटना, महागाव

Post a Comment

0 Comments