-->

Ads

शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात कृषी अधिकाऱ्याचे दर्शन, मर्जीतील केवळ दोनच शेतकरी उपस्थित..


                      फुलसावंगी (ता २९ )
:  तालुका कृषी अधिकाऱ्याने,शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवीत काल भर दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात  दोन शेतकऱ्यांना बोलावून  तालुका कृषी अधिकाऱ्याने मार्गदर्शन केले.कार्यक्रम घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अचानक भर उन्हात येवून आपल्या मर्जीतील फुलसावंगी येथील दोन शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून बीज प्रक्रिया कशी करावी,घरच्या सोयाबीन पिकाची उगवण शक्ती कशी तपासावी हि माहीत दिली.  शेतकरी अगोदरच बोगस बियान्यामुळे पूर्णपणे खचला आहे. कपाशी  हे  यवतमाळ जिल्ह्ह्यातील मुख्य

 पीक आहे पण मागील तीन ते चार वर्षांपासून बोंड आळीने शेतकऱ्यांना पुरते पोखरून टाकले आहे फुलसावंगी मध्ये  सध्या सोळा कृषी केंद्र आहेत ,यात कोणाचे गोदाम कुठे आहे हे फक्त कृषी आधिकार्यालाच आणि त्या दुकानदारालाच माहित आहे.  खरीप हंगाम तोंडावर येवून ठेपला आहे.शेतकार्यां कडून बी बियाणे आणि खत खरेदी  ची लगबग सुरु आहे परंतु योग्य  मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्याकडून होताना दिसत नाही.काही दुकानदार कच्या बिलावर,आणि बंदीअसलेला माल विकत आहेत ,मागील वर्षी एका स्थानिक कृषी केंद्र चालकाचा बियाणे विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला होता.बोगस कपाशी बीटी बियाणे ,भुईमुंगाचे बोगस बियाणे विक्रीचा ठपका ठेऊन कार्यवाही केली होती.

 कृषी अधिकार्यकडून शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. म्हणून च शेतकरी बोगस बियाणे च्या बळी पडत आहे कृषी अधिकाऱ्याने वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती देणे गरजेचे  असते पण तसे काही दिसत नाही.कधीच कोणालाही पूर्ण माहिती देत नाही. जिल्हा  आधिकारी साहेबानी अश्या बेजबाबदार तालुका कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

     महागाव तालुक्यातील असे कितीतरी कृषी केंद्र आजमितीस सध्या चालू आहे पण कृषी अधिकाऱ्याने कधीच कोणत्या ही कृषी केंद्राला साधी भेट सुद्धा दिली नाही.कृषी केंद्र वाले बियाणे व रायसायनिक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ज्यादा दराने विक्री करीत आहे.पण अध्याप पर्यंत कृषी अधिकाऱ्याने एखाद्या कृषी केंद्रात धाड टाकून एका ही कृषी केंद्रावर कारवाई करण्याची सौजन्य दाखवले नाही .जर महागाव तालुक्यातील सर्व कृषी केंद्राची वरिष्ठांकडून कसून चौकशी करण्यात आली तर तालुक्यातील बरेच से कृषी केंद्राचे परवाने रद्द झाल्याशिवाय राहणार नाही  तालुका कृषी अधिकारी कधीही कुणाच्या तक्रारी ऐकून घेत नाही, साधा फोन उचलण्याचे सौजन्य तालुका कृषी अधिकारी घेत नाही,पुसद वरून संपूर्ण महागाव तालुक्यातील गावाचा कारभार साहेब अगदी लीलया पाहत आहेत, काल परवाच तालुक्यातील काली दौ येथे भरारी पथकाने धाडी टाकून सहा कृषी केंद्र चालकांना नोटीस बजावली आहे हे विशेष तेव्हा शेतकार्यां योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.

Post a Comment

0 Comments