बदलापूर रेल्वे स्थानकानजीकची घटना
देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय बदलापूर रेलवे स्थानकानजीक आला .आज सकाळच्या साडे नऊ वाजण्याच्या स सुमारास एक 35 वर्षीय गतिमंद महिला बदलापूर रेल्वे स्थानकापासून वांगणीच्या दिशेने जाणाऱ्या रुळाच्या मध्यभागी झोपली . याच दरम्यान उद्यान एक्स्प्रेस या रुळावरून जात होती मोटरमन च्या लक्षात आल्याने त्याने ब्रेक दाबला .मात्र या महिलेच्या अंगावरून धडाडत मेल गेल्याचे लक्षात येताच मोटरमन सह सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला मात्र प्रत्यक्षात या महिलेला साधा ओरखडा देखील आला नव्हता कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत या महिलेला ताब्यात घेतलं तिच्या कुटुंबीयांचा पत्ता शोधून तिला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे .सदर महिला गतिमंद असून ती मानिसक तनावातून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहीती पोलिसांनी दिली .
आज गसकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी बदलापूर स्थानकातून उद्यान एक्स्प्रेस मार्गस्थ होताच वांगणीच्या दिशेने काही अंतरावर थांबली . यानंतर स्टेशन मास्तरांकडून पोलीस आणि स्ट्रेचर हमालाला कॉल देण्यात येताच प्रवाशासह पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला .घटनाच तशी घडली होती .पोलिसांनी स्ट्रेचर हमाला सह रेल्वे ट्रक मध्ये पोहचून पाहिले असता रेल्वे ट्रॅक च्या मध्ये एक महिला झोपली असून अंगावरून धडाडत एक्स्प्रेस गेली तरी ती महिला जिवंत होती इतकेच नव्हे तर तिला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नव्हती . पोलिसांनी तिला स्ट्रेचर हमाला मार्फत स्टेशन मास्तरांच्या केबिन मध्ये आणले असता सदर महिला गतिमंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले .रेल्वे पोलिसांनी या महिलेचा पत्ता शोधून काढत तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिलं .तिच्या कुटुंबीयांनी देखिल पोलिसांचे आभार मानले तसच तिची आई प्रमिला शिंदे यांनी तिच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे सांगत ती कधीतरी अशी घरातून निघून जात असल्याचे सांगत तिची काळजी घेण्याचे आश्वासन दिलं .
Byte : शार्दूल वाल्मिक ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण जि आर पी)
0 Comments