-->

Ads

पुणेश्वर मंदिराच्या टेकडीजवळ आढळला बेवारस मृतदेह घातपात की आत्महत्या ?

  येथील पुणेश्वर मंदिराच्या पाथथ्याशी बेवारस मृतदेह आढळल्याने गावकऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे . नागरिकांमधुन अनेक तर्कविर्तक लावले जात असुन, हा घातपात की आत्महत्या याचा शोध महागाव पोलीसांकडुन घेतला जात आहे.

 

फुलसावंगी

  भावराव नागु पवार (५० ) रा. कुरळी (घमापुर) असे मृत पावलेल्या ईसमाचे नाव आहे.
 आज सकाळी गावातील काही नागरिकांना मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या निर्जळ स्थळी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. याबाबत पोलीस पाटील राजेश नाईक यांनी महागाव पोलीसांना अवगत केले. महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. या मृतदेहाच्या जवळ उंदिर मारण्याच्या औषध आढळले आहे. त्यामुळे हा घातपात की आहे की आत्महत्या ? याचा शोध महागाव पोलीसांकडुन घेतला जात आहे. पुढील तपास बिट जमादार निलेश पेंढारकर,  शिपाई बालाजी मारकड करीत आहेत.



          कालच १७ जुनला भावराव नागु पवार हे घरून गायब असल्याची तक्रार त्यांच्या कुंटुबियानी दराटी पोलिस स्टेशनला केली असल्याचे कळते.

Post a Comment

0 Comments