गोवा एक्सप्रेस मध्ये पिण्याच्या पाण्यावरुन दोन युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याने जागीच मृत्यू झाला ही धक्कादायक घटना दौंड रेल्वेच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी एकास अटक करण्यात आले आहे. ३३ वर्षीय गजानन राठोड असे फेकून दिलेल्या युवकाचे नाव आहे
मनमाडकडून पुण्याकडे जाणारी गोवा एक्सप्रेस उशीरा धावत असल्यामुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे दौंड रेल्वे स्टेशनला आली. गजानन राठोड याने नितीन जाधवकडे पिण्यासाठी बाटलीतील पाणी मागीतले. नितीनने पाणी दिले नाही. या किरकोळ कारणावरुन गजानने नितीनच्या कानफटात मारले, यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि केडगाव स्टेशन येण्याच्या अगोदर गजाननला नितीनने रेल्वे डब्यातील स्वच्छतागृहाजवळ आणले आणि धावत्या गाडीतून त्याला खाली ढकलून दिले.
Byte : युवराज कलगुटगे ( पोलिस निरीक्षक,दौंड लोहमार्ग )
0 Comments