-->

Ads

फुलसांवगी ते ईसापुर रस्ता लवकर दुरुस्त करा ईसापुर ते फुलसांवगी रस्ता देत आहे अपघाताला आमंत्रण

                फुलसांवगी ते ईसापुर रस्ता लवकर दुरुस्त करा



उमरखेड : प्रतिनिधी संजय जाधव

देशातील रस्ते सुरळीत आणि व्यवस्थित असतील _तसेच दळणवळणाची साधने सुरळीत असले तर देश प्रगती करू शकते. यामुळे देशाचे सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी ही बाब हेरत आणि या बाबीवर लक्ष केंद्रित करीत या गोष्टीवर विशेष भर दिला. तर देशातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.


हे ही वाचा - उमरखेड, यवतमाळ पत्रकारांवर अन्याय होऊ देणार नाही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उमरखेड तालुका बैठकीत निर्णय

आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अर्धापुर ते हिमायतनगर आणि हिमायतनगर ते फुलसावंगी सुरू असलेला राष्ट्रीय महामार्ग. तर अर्धापूर ते हिमायतनगर 64.700 पॅकेज क्र. 1 आणि हिमायत ते फुलसावंगी 40.30 पॅकेज क्र. 2 ह्या महामार्गाचे काम प्रगती पथावर सुरू असून सदर काम हे रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी हे करीत या महामार्गाला लागणारा मुरूम हे नारळी ते फुलसावंगी येथे हायवा गाडीने ओव्हरलोड वाहतूक होत आहे पण फुलसांवगी ते ईसापुर रोड हा संपूर्णपणे अपघाताला आमंत्रण देणारा ठरलेला आहे सध्या पेरणीचे दिवस असल्याकारणाने शेतकरी बांधव प्रमाणात फुलसांवगी ही मोठी बाजारपेठ असल्याकारणाने फर्टिलायझर वर बी बियाणे खरेदीसाठी येत आहे फुलसांवगी रोड वर चिखल मातीचे व मोठाले खड्डे पडल्या कारणाने शेतकऱ्यांना 

हे ही वाचा - शाळेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नागपूरातील 25 वर्षीय नराधमाला अटक


व नागरीकाना मोठ्या प्रमाणात  वाहनचालकांना त्रास होत आहे  ईसापुर रोड  वर मोठ्या प्रमाणात गढे पडलेले आहेत व चिखल मातीचे ढिगारे साचले आहेत या रोड कडे जिल्हा परिषद  बांधकाम विभाग लक्ष देईल का व शेतकऱ्यांना व नागरिकांना होणारा त्रास कमी करता येईल का याकडे सगळ्यांचं नागरिकांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

0 Comments