Rape in Mumbai: मुंबईतील (Woman) एका महिला पोलीस अधिकाऱ्याला (Woman Police Officer) ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार (Blackmail and Sexual Harassment Case) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे
पीडित महिला मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावर एका खाजगी बँकेत अधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख झाली होती. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर दोघांत मैत्री वाढत गेली. कालांतराने यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधात झालं.
लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ केला शूट
दरम्यान आरोपी प्रियकर एकेदिवशी पीडित महिलेला चकाला येथे भेटायला आला होता. याठिकणी आरोपीनं पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडीओही शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं अनेकदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे.
पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच पीडित महिलेचं एका तरुणाशी लग्न ठरलं होतं. याची माहिती आरोपीला मिळताच त्यानं पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला याची माहिती देऊन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी पीडितेला सतत ब्लॅकमेल करून अत्याचार करत होता. त्यामुळे पीडित महिला अधिकाऱ्यानं आरोपीच्या त्रासाला कंटाळून मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी पवई पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस घटनेचा तपास करत आहे.
0 Comments