बाप रे बाप चोरट्यानी चक्क एटीएम मशीन पळवली ; महागाव येथील प्रकार
येथील इंडिया नंबर - १ नामक बँकेचे खाजगी एटीएम मशीनसह त्यातील रोकड लांबाविल्याचा प्रकार महागाव येथे आज सकाळी घडकीस आला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंढे आणि महागाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक विलास चव्हाण यांनी आपल्या चमूसह दाखल होऊन निरीक्षण करून तपासकार्यास वेग दिला आहे. दरम्यान श्वान पथक आणि ठसे तज्ञास पाचारण करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. एटीएम मध्ये शिल्लक असलेल्या कॅश बॉक्स मधील रक्कम बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
पोलिसांना चॅलेंज देऊनच चोरट्यांनी एटीएम मशीन पळवली आहे का ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. तर रात्रीच्या गस्तवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान घडलेल्या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला असल्याचे पोलीस विभागातून सांगण्यात आले आहे.
0 Comments