पत्रकारांवर अन्याय होऊ देणार नाही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उमरखेड तालुका बैठकीत निर्णय
उमरखेड : प्रतिनिधी संजय जाधव
उमरखेड, यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड तालुका कार्यकारिणीची मुळावा सर्कल येथे नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा निर्णय प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,उमरखेड तालुक्याच्या वतीने घेण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, जिल्हा महिलाध्यक्षा अर्चनाताई भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड तालुक्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही कायम लढणार असल्याचे उमरखेड तालुकाध्यक्ष मारोती गव्हाळे यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्याबद्दल संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला व ज्या पत्रकारांच्या समस्या होत्या त्या समस्याही जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात आल्या.
हे ही वाचा - शाळेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नागपूरातील 25 वर्षीय नराधमाला अटक
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य ही संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढत असून महाराष्ट्रातील पत्रकारांवर हल्ला केल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण प्रेस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हा सातत्याने पत्रकारांच्या न्याय, हक्क व कल्याणार्थ काम करीत आहे असे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी पत्रकारांना संबोधित केले. तर राज्य महिलाध्यक्षा सविता चंद्रे आणि जिल्हा महिलाध्यक्षा अर्चनाताई भोपळे यांनी महिला पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही संघाच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी उमरखेड तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पंकज गोरे, तालुका सह संघटकपदी सुनील कदम, तालुका समन्वयकपदी भागवत काळे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, जिल्हा महिलाध्यक्षा अर्चनाताई भोपळे, जिल्हा कोषाध्यक्ष गजानन गंजेवाड, जिल्हा कोषाध्यक्ष, जिल्हा संघटक उदय पुंडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष मोहन कळमकर, उमरखेड तालुका अध्यक्ष मारुती गव्हाळे, उपाध्यक्ष सुनील ठाकरे, हिंगोलीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते
0 Comments