-->

Ads

सोलापूर लसीचा काळाबाजार थांबवण्यासाठी ठिय्या आंदोलन

 सोलापूर -  बार्शी तालुक्यातील चालू असलेला लसीचा काळाबाजार थांबवण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांसमोर पारदर्शकता आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पारदर्शकता पाळण्यासाठी ठिय्या आंदोलन, ठिय्या आंदोलन, ठिय्या आंदोलन







 मागील काही दिवसांपासून बार्शी शहर व तालुक्यामध्ये लसीकरणाचा गैरव्यवहार, तसेच वशिला लावून लसीकरण होत असल्याचे निदर्शनास आल्याने आज  पासून जोपर्यंत लसीकरणाचा पुरवठा सुरळीत होत नाही, अधिकारी पारदर्शकता बाळगत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार.


बार्शीतील लसीकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते उमेश दिलीप नेवाळे रा: बालाजी कॉलनी,सोलापूर रोड बार्शी

हे लसीकरणाबाबत आवाज उठवत प्रशासनाला ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता, याबाबत कोणतेही उत्तर न मिळाल्याने ते आज बार्शी तहसील कार्यालयासमोर या आंदोलनास बसले आहेत. 

          

आंदोलनाबाबत माहिती देताना ते असे म्हणाले की, आमच्या भागातील तसेच बार्शीतील वयस्कर लोकांचा लसीकरणासाठी रांगा लागलेल्या पाहून वयस्कर यांच्या लसीकरणासाठी आम्ही काही तरुणांना सोबत घेऊन लसीकरणासाठी रांगेत उभारलो असता लसीकरण केंद्रावर असे आढळून आले की,शहरातील मान्यवर, लोकसेवक, नगरसेवक, व्यापारी व राजकीय लोकांशी संबंधित असलेले बडे हस्ती नागरिकांच्या लसीकरणाच्या रांगेत न उभे राहता ते थेट लसीकरणासाठी सभागृहात प्रवेश करताना व अधिकाऱ्यांनी संगनमताने लसी घेताना आणि अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करताना, वशिला लावताना दिसून आले.


            याबाबत अधिक माहिती विचारली असता सर्वत्र ठिकाणी अधिकारी व कर्मचारी हे उडवाउडवीची उत्तरे देत होती व अनियमित पणामुळे लसीकरण उपलब्ध नसल्याचे नेहमीच सांगण्यात येत होते व आले आहे. ज्या दिवशी लसीकरण उपलब्ध नाही असे सांगितले जाते, त्याच दिवशी तालुक्याच्या विविध भागात चोरून लस देत असल्याचे आढळून आले. 


          याबाबत यात पारदर्शकता उघड आणण्यासाठी 




                                                                     


                                                                प्रमुख मागण्या



1)  सोलापूर शहरामध्ये जिथे लसीचा स्टॉक उपलब्ध आहे त्याच ठिकाणी परत परत स्टॉक दिला जातो  परंतु दुसऱ्या ठिकाणी मात्र लस शिल्लक नाही असे सांगितले जाते याची तात्काळ दखल घेऊन लसीकरणाचे नियोजन पारदर्शक करून सर्व ठिकाणी समान पद्धतीने लसीकरण उपलब्ध करण्यात यावे.


2)  बार्शी शहरातील व तालुक्यातील लसीकरण सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या लसीकरणाची तातडीने चौकशी करावी यात मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी झाले असल्याने त्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. 


3)  आतापर्यंत बार्शी शहर व तालुक्याला  किती लस आल्या व त्या कोणाकोणाला दिल्या याची संपूर्ण माहिती आम्हाला लेखी स्वरूपात मिळावी ही माहिती (लिस्ट) आम्हांला दिनांक व ठिकाण नुसार मिळावी.


4)  बार्शी शहर व तालुक्यातील फ्रंट लाईन वर्करला आतापर्यंत किती लस दिल्या त्याची लेखी स्वरूपात माहिती (लिस्ट) देणे ही माहिती दिनांक व ठिकाण नुसार देणे.


5)  सर्वप्रथम फ्रंट लाईन वर्कर यांना प्रथम प्राधान्य देऊन लसीकरण पूर्ण करून त्याच बरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नियमानुसार लसीकरण करून घेण्यात यावे.

           ( माझा आणि माझ्या कुटुंबाचा फ्रंट लाईन शी काहीही संबंध नाही)


6)   “वार्ड निहाय कुपन देण्याऐवजी वार्ड निहाय लसीकरण” केल्याने ४५ पुढील नागरिकांना रांगेत उभारण्याचा त्रास वाचेल म्हणून वार्ड निहाय लसीकरण करण्यात यावा यातही संपूर्णपणे पारदर्शकता असावी.

Post a Comment

0 Comments