-->

Ads

सुरत येथील व्यापारीचा खून अवैध दारू तस्करी तुन झाल्याचे निष्पन्न, 3 आरोपीं अटकेत ...


                      नंदुरबार :  17 जून रोजी नवापूर येथे भावेश मेहता नामक व्यावसायिकाच्या झालेला खून हा अवैध दारू तस्करीच्या वादातून झाल्याचा निष्पन्न झाले आहे.17 जून रोजी नवापूर हद्दीत  सी एस गाडीत एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता, त्यानुसार नवापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास करता खून झालेला इसम हा सुरत येथील व्यावसायिक भावेश मेहता आहे असे निष्पन्न झाले.  सदर खून झालेला व्यक्ती हा बाहेरच्या असल्या कारणाने नवापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अशा दोन टिमा सुरत येथे पाठवण्यात आल्या. सदर खुनाचा गुन्हा तांत्रिक आधारावर करण्यात आला असून यामध्ये सुरत गुन्हे अन्वेषण शाखेची मदत  घेण्यात आली व त्या मदतीच्या आधारे सदर गुन्हा हा निष्पन्न करण्यात यश आले आहे . यामध्ये सात आरोपी निष्पन्न झाले असून प्रमुख आरोपी अनिल काठी आहे .अनिल काठीचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्या व्यवसायात भावेश मेहता याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते त्याचा राग डोक्यात ठेवून भावेश मेहता याच्या खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेत सात आरोपी निष्पन्न झाले असून तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे व  चार आरोपी अजून फरार आहेत त्यांच्या शोध घेण्यात येत आहे लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन अहिरे यांनी दिली....

Post a Comment

0 Comments