-->

Ads

डोंबिवली संबंध असल्याच्या संशयावरुन निष्पाप 14 वर्षीय पुतणीची काकाने केली हत्या

   एका 14 वर्षीय अल्पवयीन निष्पाप मुलीची हत्या तिच्या काकानेच केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली संबंध असल्याच्या संशयावरुन निष्पाप 14 वर्षीय पुतणीची काकाने केली हत्याडोंबिवलीत घडला प्रकार पोलिसानी केली अटक


 या प्रकरणात डोंबिवली रामनगर पोलिसांनी आरोपी काका मयुरेश सफलिंगा याला अटक केली आहे.

डोंबिवली पूर्व भागातील त्रिमूर्ती परिसरात सफलिंगा कुटुंब राहते. महेश सफलिंगा यांची पत्नी आरती, 14 वर्षाची मुलगी , महेशचे भाऊ मयुरेश आणि मानलेला भाचा शंकर हे राहतात. 17 जूनच्या पहाटे मयुरेश याने आपल्या भाऊ महेशला सांगितले की, शंकर हा मुलीच्या बाजूला का झोपला होता. मयुरेश याला शंकर आणि मुलगी यांच्यात संबंध असल्याचा संशय आला. मात्र मुलीने आणि शंकरने या संदर्भात स्पष्ट नकार दिला. मात्र मयुरेश काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सकाळीच सात वाजताच्या दरम्यान रिक्षा चालवून तो घरी परतल्यावर त्याने शंकरला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर मुलीला सुद्धा मारहाण करीत घराबाहेर नेले. दारावर तिचे डोके आपटल्याने मुलगी  गंभीर जखमी झाली. रोशनी जखमी झाल्यावर तिची आई आणि काका तिला रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर मुलीला घरी घेऊन आले. पुन्हा ती बेशुद्ध पडली. तिने डॉक्टरकडे नेले असता तिला डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले. काका मयुरेशने पुतणीला बेदम मारहाण केली म्हणून तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत काका मयुरेशला अटक केली आहे.



बाईट : - समशेर तड़वी ( api गुन्हे शाखा )

Post a Comment

0 Comments