Crime in Sangli: सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape On minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संबंधित 25 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव फैय्याज मेहबूब कोकणे असून तो मिरजेतील बोकड चौक येथील रहिवासी आहे. आरोपीचं बोकड चौकात चिकनचं दुकान आहे. याठिकाणी चिकन घ्यायला येणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीशी आरोपी कोकणेची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. यानंतर 22 मार्च रोजी अल्पवयीन मुलगी घरी एकटीचं असल्याचं पाहून आरोपी कोकणे मुलीच्या घरी गेला. याठिकाणी आरोपीने पीडितेला घराबाहेर बोलावून नकळत गुंगीची गोळी खायला दिली. यानंतर आरोपी तिला तिच्याच घरात घेऊन गेला.
पुढारी
ने दिलेल्या वृत्तानुसार, घरात गेल्यानंतर आरोपीनं पीडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक चाळे करायला सुरुवात केली. पीडिता याला विरोध करत असताना आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने अशाच प्रकारे अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेनं आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून या घटनेची माहिती तिच्या आईला दिली. यानंतर या संतापजनक घटनेला वाचा फुटली आहे.
पीडित मुलीच्या आईने घटनेची माहिती मिळताच आरोपी तरुणाविरुद्ध मिरज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी फैय्याज मेहबूब कोकणे विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत.
0 Comments