Weather Alert: 15 मे च्या आसपास अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असून उद्यापासून चक्रीवादळाची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उद्यापासून अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अरबी समुद्रात मच्छिमारांसोबत अन्य बोटींना लवकरत लवकर किनारपट्टीवर येण्याचा इशारा देण्यात आली आहे. त्याचबरोबर 15 मेच्या आसपास काही दिवस मच्छिमारांनी अरबी समुद्र, मालदिव, कोमोरीन, लक्षद्विप आणि केरळ किनारपट्टीच्या समुद्री भागात फिरकू नये, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
त्याचबरोबर सध्या मालदिव, लक्षद्विप, अरबी समुद्रात मासेमारीसाठी किंवा पर्यटनासाठी समुद्रात जे गेले आहेत. त्यांनी 12 मेच्या रात्रीपर्यंत किनारपट्टीवर परतण्याची गरज आहे. त्यानंतर समुद्रातील हालचाली धोकायदाक ठरू शकतात. त्यामुळे 14 मेच्या रात्रीपासून केरळ, लक्षद्विप, कर्नाटक, महाराष्ट्रस गोवा किनारपट्टीवरील भागात राहणाऱ्या लोकांनी जास्तीची काळजी घेणं आवश्यक आहे.
तसेच 14 आणि 15 मे रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह तामिळनाडू आणि कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता आहे. एकीकडे राज्याला कोरोनानं ग्रासलं असताना अवकाळी पाऊस आणि आता चक्रीवादळाची स्थिती यामुळे राज्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
0 Comments