-->

Ads

TDRF च्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त TDRF जवानानकडून गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप

             कोणत्याही आपत्तीमध्ये मानवसेवा व गरजूंच्या मदतीसाठी TDRF अग्रेसर

                                                                                                                                                       

-TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड


उमरखेड: प्रतिनिधी संजय जाधव

TDRF ला आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करत असताना 9 मे 2021 रोजी 16 वर्ष पूर्ण झाले. दरवर्षी TDRF वर्धापन दिन (TDRF Day) हा सर्व TDRF जवान एकत्रित येऊन साजरा करीत असतात. परंतु यावर्षी Covid-19 च्या प्रदुभावामुळे लॉकडाऊन झाल्याने एकत्रित येऊ शकत नसल्यामुळे सर्वांनी आपापल्या तालुक्‍यांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा केला.

उमरखेड तालुक्यात शहरातील व नजीकच्या गावातील गरजू कुटुंबाना वर्धापन दिनानिमित्त TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात उमरखेड कंपनीतील TDRF जवानांनी 100 जीवनावश्यक किराणा किटचे वाटप केले. त्या किटमध्ये स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. या उपक्रमासाठी TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस कार्यरत होते. सोबतच या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कंपनी कमांडर सुरज सूर्यवंशी,हर्षद पाईकराव, कंपनी ड्रिल इंस्ट्रक्टर ओमकार पनोळे, ओमकार देवकते,अनिकेत सूर्यवंशी, सौरभ हरण, योगिता भालेराव, कंपनी सेक्शन कमांडर ज्ञानेश्वर हिंगाडे, प्रतीक्षा येरावार, त्रिशाला शिरगरे, अश्विनी साखरे यांनी वाटपाचे विशेष कार्य केले. एवढेच नाही ही तर मागच्या वर्षीपासून’ आज पर्यंत TDRF जवानांकडून कोरोना महामारीमध्ये मदत व सेवाकार्य करीत आहे तसेच प्रत्येक गावात Covid-19 व लासिकरण संदर्भात जनजागृती करित आहेत. सदर सेवाकार्याची माहिती तहसिलदार उमरखेड श्री. आनंद देऊळगावकर यांना दिली असता त्यांनी TDRF च्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

मागील 16 वर्षापासून TDRF नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये राष्ट्रसेवा व नागरीसुराक्षेचे कार्य करीत आहे. TDRF वर्धापन दिनाच्या दिवशी TDRF संस्थापक तथा संचालक हरीश्चंद्र ब. राठोड यांचा वाढदिवस ही असतो.

Post a Comment

0 Comments