आज हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी डापकर, तहसीलदार गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोहरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांच्या समवेत कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली.
यवतमाळ प्रतिनिधी संजय जाधव
त्यावेळी सद्यस्थितीतील तालुक्यातील सेंटर मधील ४ रुग्ण, होम क्वॉरनटाइन १०५३ तर एकूण अॅक्टिव्ह रुग्ण २१९ असा आढावा डॉ. गायकवाड यांनी दिला.त्याचबरोबर सफाई कामगार, कॉम्पुटर ऑपरेटर वाढवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क करून लवकरात लवकर कर्मचारी भरती करून समाजाचा त्रास दूर करावा अशा सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना PHC ला मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी बोलणे करून दिले. यानंतर खा. हेमंतभाऊ पाटील यांनी ग्रामीण रुग्णालय, हि.नगर येथे भेट देऊन पाहणी केली.
रुग्णालयातील अस्वच्छता व घाण पाहून खा. हेमंतभाऊ पाटील यांनी संबंधित आरोग्य अधिकारी आणि सफाई कामगार यांना धारेवर धरले. लवकरात लवकर रुग्णालयातील घाण साफ करून स्वच्छता करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील.
त्याचबरोबर त्यांनी हिमायतनगर येथील औद्योगिक इमारतीतील कोरोना सेंटरला भेट देऊन रुग्णांची आस्थेवाईक विचारपूस केली आणि संबंधितांना सूचना केल्या. त्यावेळी गटविकास अधिकारी मांजरमकर , ता. प्रमुख रामभाऊ ठाकरे, नगराध्यक्ष कुणाल राठोड, शहरप्रमुख प्रकाश रामगीरवर, ता. उपप्रमुख विलास वानखेडे, माजी जि. परिषद सदस्य ढोले बापू, विशाल राठोड, कपिल हराळे, किसान सेल ता. अध्यक्ष प्रकाश जाधव, शहर उपप्रमुख रामू नरवाडे, वाळकेवाडीचे उपसरपंच संजय माझळकर, नगरसेवक सावन डाके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments