जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल तालुक्यातील वनकोठे साखर कारखाना कॉलनी परिसरात राहणारे रामचंद्र भील यांच्या तरुण मुलीचे घरात काम करीत असताना अचानक सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.त्यांची परिस्थिती गरिबीची असून मोलमजुरी करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. ह्या घडलेल्या घटनेची दखल प्रहार अपंग क्रांती चे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांनी घेऊन त्यांनी परिसरातील लोकांना एकत्र करून कासोदा गाव परिसरात मदत फेरी काढून काही प्रमाणात धान्य व रोख रक्कम गोळा केली होती. व ही मदत ह्या गरजू कुटुंबाला पोहोचवणे गरजेचे होते. कारण लॉकडाऊन मुळे त्याना कोणतेही काम मिळेनासे झाले होते. परंतु वनकोठे गाव कोरोना हॉटस्पॉट घोषित झाल्याने गोळा झालेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येत होत्या.त्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत रामचंद्र भील यांना घरी जाऊन मदत पोहोच करण्यात आली. यावेळी प्रहार क्रांतीचे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, गुलाब गंभीर पाटील, शेखर सुरेश पाटील, देवा मामा, अमोल बडगुजर यांची उपस्थिती होती. रामचंद्र भील यांनी कासोदा गाव परिसरातील सर्व नागरिक तसेच व्यापारी वर्गाचे आभार मानले आहेत.
0 Comments