-->

Ads

प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या, घरात एकटी असल्याची संधी साधत धारदार शस्त्राने केले वार

 

Yavatmal girl murder तरुणी घरामध्ये एकटी असल्याची संधी साधून आरोपीने घरात घुसत तिच्यावर धारदार शस्त्रानं अनेक वार केले. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा परिसरात आहे.




    यवतमाळ, 15 मे : यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यात (Pusad Tehsil Yavatmal) असलेल्या रामपूर गावामध्ये (Rampur Village) एका तरुणीच्या हत्येमुळं एकच खळबळ उडाली आहे. तरुणी घरामध्ये एकटी असल्याची संधी साधून आरोपीने घरात घुसत तिच्यावर धारदार शस्त्रानं अनेक वार केले. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा परिसरात आहे. खंडाळा पोलिसांनी या घटनेनंतर संशयित आरोपीला अटक केली आहे.

    (वाचा- मुंबईत बॉलिवूड स्टारच्या घराबाहेर तरुणीवर सामूहिक बलात्कार, युवकांनी मैत्रीला फासला काळिमा )

    कोरोनाच्या लॉकडाऊनमुळं लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं सर्वत्र शांतता असताना यवतमाळच्या पुसद तालुक्यात खुनामुळं खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका 21 वर्षीय तरुणीची एका तरुणानं हत्या केली आहे. रामपूरमध्ये राहणाऱ्या या तरुणीचं नाव सुवर्णा असं आहे. सुवर्णाचे आई वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळं सुवर्णा ही घरी एकटीच होती. त्याचाच फायदा घेत आकाश आडे हा तरुण तिच्या घरात शिरला. आकाशनं सुवर्णावर धारदार शस्त्रानं एकापाठोपाठ एक सपासप अनेक वार केले. या हल्ल्यामुळं सुवर्णाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

    Post a Comment

    0 Comments