-->

Ads

उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार कोरोना वर मात करून जनतेच्या सेवेमध्ये दाखल

उमरखेड महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार नामदेव ससाने साहेब स्वतः कोविड पॉसीटीव्ही असल्यामुळे दवाखान्यात ट्रीटमेंट घेत होते तिथे सुद्धा त्यांना मतदार संघातील गोरगरीब जनतेचे होत असलेले हाल स्वस्थ बसू देत नव्हते 


यवतमाळ प्रतिनिधी संजय जाधव

अशावेळी आमदार साहेबांनी  जिल्हाधिकारी ,संबंधित आरोग्य यंत्रणा यांना पत्रव्यवहार तसेच दूरध्वनीवरून संपर्क करून  उमरखेड व महागाव येथिल रुग्णाचे होत असलेले हाल पाहून लवकरात लवकर अद्यावत कोविड रुग्णालय चालू करण्यासाठी स्थानिक आमदार निधीतून अत्याधुनिक एक्सरे मशीन ,लिक्विड ऑक्सिजन प्लांट,उमरखेड साठी एक कार्डीयाक  अँबुलन्स व उमरखेड न. पा. ,महागाव नगरपंचायत व ढाणकी नगरपंचायतसाठी एक एक अँबुलन्स आमदार ससाने यांनी स्थनिक निधीतून दिली आहे मा. मदनभाऊ येरावर, जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा यांच्या सहकार्यातून अविरत प्रयत्न करून कोविड रुग्णालय सुरु होत आहे त्याच्या अंतिम कामाची पाहणी करण्याकरिता आज कोविडचा होमक्वांरटाईन कालावधी संपताच आमदार नामदेव ससाने,जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भुतडा, एसडीओ कापडणीस साहेब,ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर रमेश मांडण,  दिलीपजी सुरते, जिल्हासचिव महेशजी काळेश्वरकर,तालुकाध्यक्ष सुदर्शनजी रावते, शहराध्यक्ष अजयजी बेदरकर ,बबलू मैड,गजानन मोहळे,मंगल पांडे,व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments