-->

Ads

शिवसेनेन पालकमंत्र्यांच्या पुतळ्याचे केले दहन



    सोलापूर : उजणी धरणातून पाच टि एमसी पाणी पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे शिवसैनिकांनी दहन केले.

 

           उजणी  धरणाची निर्मितीच सोलापूर जिल्हयासाठी झाली आहे. सोलापूर जिल्हयातील शेतकरी  प्रगती शिल व्हावा यासाठी हे धरण बांधण्यात आले आहे. सोलापूर जिल्हयाला अद्यापही उजणी धरणातून व्यवस्थीत पाणी मिळत नाही. आनखी बराच भाग कोरडा असताना पाच टीएमसी पाणी पळवण्याचा प्रयत्न होत आहे. तो आदेश तात्काळ  रद्द व्हावा अन्यथा  आम्ही जिवनाचा त्याग करू असा इशारा उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार यांनी दिला आहे. यावेळी शिवसैनिकांनी पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच अशी घोषणाबाजी करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांला प्रतिकात्मक पुतळा दहन केला. यावेळी

             शिवसेना उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष कयूम शेख ,भागवत मुळे, बाळासाहेब वाघमोडे , प्रमोद लांडे , दयानंद व्यवहारेआदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments