उमरखेड पंचायत समिती अंतर्गत कार्य करत असलेले माऊली म्हणून प्रसिद्ध असलेले श्री संतोष डाकोरे साहेब विस्ताराधिकारी उमरखेड यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून गाव खेड्यांचा विकास व्हावा व ग्रामीण भागामध्ये ग्राम गीतेचा प्रचार व्हावा म्हणून त्यांनी आपल्या स्वखर्चातून प्रत्येक कर्मचाऱ्यांना व सरपंच उपसरपंच यांना उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस तहसीलदार यांना ग्रामगीता भेट देण्यात आले “गाव हा विश्वाचा नकाशा गावावरुन देशाची परिक्षा गावची भंगता अवदशा येईल देशाही ग्रामगीतेमधील ओवी आहे”. या ओवीतच गाव ते देशाचा प्रवास एकवटला आहे. गावावरुनच देश मोठा ठरत असेल तर गावातील प्रत्येक घटक जसे..शिक्षण, आरोग्य, शेती, जुजबी कला, चारित्र्य, सामुदायिकता, नैतिक मूल्ये हे सर्व सुद्रुढ असल्यास पाहिजे. ह्या सर्व बाबी फक्त आणि फक्त शिक्षणावरच अवलंबून आहेत,एकमेकांना पुरक आहेत.
राष्ट्रसंतांचे शिक्षण-विषयक विचार खुप दुरगामी होते, जे आजच्या शिक्षणासी विसंगत आहेत. त्यांना जीवन - शिक्षण अपेक्षित होते. 1960 च्या दशकात जी शिक्षण व्यवस्था प्रचलित होती. त्याबद्दल नाराजी व्यक्त करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात ते लिहितात......
देश को उँचा उँठाणा है,तो शिक्षण की प्रथा बदलो/सभी को काम करने दो,तरुणो की व्यथा बदलो Res.APJ च्या स्वप्नातील महासत्ता देश घडवायचा असेल तर विद्यार्थी किमान एका कलेत तरी पारंगत असायला हवा. कारण...कलेनेच माणसाची ओळख एरवी पुसतो कोण आणिक तुम्ही आहात राव कि रंक कोणी काही पुसेना
पुढे महाराज लिहितात.....चले जाने दो खेतो मे,गुरुजी और सेवक(विद्यार्थी)भी वहीं होगी परिक्षाँए, व्रुक्ष की छाँव मे बदलो/पुढे ते सावध करतात..नुसते नको उच्चशिक्षण, हे तो गेले मागीलयुगी लपोनआता हवा कष्टीक बलवान, सुपूत्र भारताचा
दिखाऊ कपडे, कोरडी ऐट/नोकरपेशी थाटमाट/हे शिक्षणाचे नव्हे उद्दिष्ट/ध्यानी घ्यावे नीट हे आधी
वर्तमान शिक्षण पध्दती म्हणजे शाळा, काॅलेज,कोचिंग क्लासेस, स्पर्धा परिक्षा. नोकरी लागली तर ठिक नाहीतर.....मग या विद्यार्थाजवळ दुसरं आहे तरी काय...? वय निघून जाते...हताशा-निराशा वाढते. प्रसंगी टोकाचा निर्णय सुद्धा घेते, हे दुर्दैवाने म्हणावे लागते.
शिक्षणातची जीवनाचे काम,दोन्हीची सांगड असावी उत्तम/चिंता नसावी भोजनासाठी दाम,मागण्याची भीक जैसी//
त्यासाठी विद्यार्थी एखाद्या तरी कलेत निपुण असावा जी आयुष्यभर पोट भरण्याची शिदोरी असेल. अशिक्षीत स्वयंपाक करोनी खाई,सुशिक्षित चणे फाकित राही, दोरास घालता न ये वंधाही, जेथे-तेथे पराधिन
याच साठी शिक्षण घेणे, की जीवन जगता यावे सुंदरपणे/दुबळेपण घेतले आंदणे, शिक्षण त्यासी म्हणो नये//
यासाठी कौशल्याधिष्टित शिक्षण,व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे. जेणेकरून शाळा-विद्यालयातून जगाच्या बाजारात आलेला विद्यार्थी जग-रहाटीत स्वतःला Adjust करुन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व तयार करेल. त्याच्या जीवनाचा कल्ला होणार नाही. साध्या पणाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
3Dन्युज
संजय जाधव उमरखेड
0 Comments