औरंगाबादच्या एका आठ वर्षाच्या मुलासाठी गुरूवारची रात्र सर्वस्व हिरावून घेणारी ठरली आहे. मामाला भेटायला गेलेले त्याचे आई-बाबा घरी परतलेच नाहीत. त्यामुळे या आठ वर्षाच्या चिमुकल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित मुलाचे आई-बाबा गुरुवारी सायंकाळी आपल्या आठ वर्षाच्या मुलाला घरी ठेवून मामाला भेटायला गेले होते. मामाला भेटल्यानंतर दुचाकीवरून घरी परतत असताना एका भरधाव कारनं त्यांना जोरदार टक्कर मारली आहे. या अपघातात संबंधित मुलाची आई उंच फेकली गेली. तर त्याचे बाबा जवळपास 80 फुटापर्यंत दुचाकीसोबत फरफटत गेले. या अपघातात दोघंही पती- पत्नी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केलं. पण शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी रात्री साडे अकराच्या सुमारास टीव्ही सेंटर रस्त्यावरील एसपीआससमोर घडली आहे.
या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या 42 वर्षीय महिलेचं नाव सुनीता प्रकाश शेळके असून त्या मयूरनगरातील पाटणी रेसिडेन्सीत राहतात. मृत सुनीता गुरूवारी सायंकाळी आपल्या पतीसोबत जवळच राहणाऱ्या आपल्या भावाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या आठ वर्षाच्या मुलाला घरीच ठेवलं होतं. भावाला भेटल्यानंतर मोपेड दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला भीषण
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य घरी जात असताना युटर्न घेण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकाजवळ थांबले होते. दरम्यान डी मार्टकडून येणाऱ्या भारधाव कारने त्यांना जोरात धडकी मारली. या भयानक अपघातात सुनीता या उंच फेकल्या गेल्या. ज्यामध्ये त्यांच्या डोक्याच्या मागील भागात गंभीर दुखापत झाली. तर पती दुचाकीसोबत जवळपास 80 फुट फरफटत गेला. या अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पती पत्नींना रुग्णालयात दाखल केलं. तर दुसरीकडे काहीजणांनी कारचालक अमोल कीर्तीकर याला बेदम मारहाण केली.
जखमी दाम्पत्याला दोन वेगवेगळ्या गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण दरम्यान तीन रुग्णालयांनी सुनीता यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. आणि घाटी रुग्णालयात नेण्यास सांगितलं. या धावपळीत किमान एक तास वाया गेल्याची माहिती संबंधित तरुणांनी दिली. पती प्रकाश शेळके यांना सध्या बीड बायपास रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. संबंधित घटनेची नोंद सीटी चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
0 Comments