-->

Ads

हिंदू विवाह कायद्याची होळी ; 90 टक्के महिला दुरोपयोग करत असल्याचा आरोप

 


              पुणे :  हिंदू विवाह कायद्याचा 90 टक्के महिला दुरोपयोग करत आहेत. 10 टक्के पुरुष देखील याचा दुरोपयोग करत आहेत. पण, फक्त महिलांसाठी बनवलेल्या या कायद्यात पुरुषांना न्याय मिळावा यासाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे पोटगी बंद आंदोलनाच्या वतीने या कायद्याचा निषेध करत त्याची होळी केली.


            पोटगी बंद आंदोलनाच्या वतीने पुण्यातील पत्रकार भवन येथे नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतुल छाजेड, विकास महाजन, शशि कला गादिया, गणेश गुंजाल व मुकेश खनके उपस्थित होते.यावेळी बोलताना अतुल छाजेड म्हणाले, हिंदू विवाह कायद्याचा 90 टक्के महिला दुरोपयोग करत आहेत. यामुळे अनेक पुरुष आत्महत्या करत आहेत. तरीही, न्यायव्यवस्था सुधारायला तयार नाही. हा देशद्रोही कायदा बंद व्हायला हवा. पुरुषांना न्याय मिळावा यासाठी पुरुष हक्क आयोगाची स्थापना केली जावी. तसेच, महिलांचे आरोप खोटे सिद्ध झाल्यास त्यांना देखील शिक्षा मिळावी. अशी मागणी अतुल छाजेड यांनी केली. या मागण्यांसाठी न्यायालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे छाजेड यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments