Suicide News: पोटच्या दोन लेकरांना आणि पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीच्या विरहात एका युवकानं आत्महत्येचा प्रयत्न (husband tried to commit suicide) केला आहे.
.रांजणगाव येथील रहिवासी असलेली 26 वर्षीय विवाहित महिला काही दिवसांपूर्वी आपल्या घराशेजारी राहाणाऱ्या अविवाहित प्रियकरासोबत पळून गेली होती. तिने आपल्या साडे चार वर्षाच्या आणि 6 वर्षाच्या दोन मुलांना आपल्या पतीकडेचं सोडलं होतं. अशा प्रकारे पत्नी सोडून गेल्यानं संबंधित युवक नैराश्यात गेला. दरम्यान पत्नीचा विरह सहन न झाल्यानं काल संबंधित युवकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षण आपल्या पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी पीडित पतीची समजूत घालून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केला आहे. तर दुसरीकडे, एप्रिलमध्ये प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेलाही तिच्या प्रियकराने सोडून दिलं आहे. त्यामुळे तीही रांजणगावात एक स्वतंत्र खोली घेऊन राहात आहे. विशेष म्हणजे प्रियकरानं सोडून दिल्यानंतर तिनंही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही पोलिसांनी तिची समजूत घालून आत्महत्या करण्यापासून रोखलं होतं.
प्रियकराने धोका दिल्यानंतर, संबंधित विवाहित महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली असून रांजणगावातचं स्वतंत्र खोली घेऊन राहात आहे. पती पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांची होणार होरपाळ पाहून दोघांनीही पुन्हा एकत्र यावं, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
0 Comments