-->

Ads

पत्नीचा 15 दिवसांपासून सेक्स करण्यास नकार; पतीने रात्री घेतला धक्कादायक निर्णय

 या पतीने तर स्वत:च्या तीन लहान मुलांनाही सोडलं नाही.




मुजफ्फरनगर, 27 मे : 
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका 37 वर्षीय व्यक्तीनी आपल्या पत्नीची गोळी घालून हत्या केली. पत्नीने गेल्या 15 दिवसांपासून शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या पतीने गोळ्या घालून पत्नीची हत्या केली. तो नराधम इथपर्यंतच थांबला नाही तर त्याने स्वत:च्या तीन मुलांनाही कालव्यात फेकून दिलं. या घटनेनंतर मुलांचे मृतदेह सापडले आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर पतीने सांगितलं की, पत्नी गेल्या 15 दिवसांपासून शारिरीक संबंध ठेवण्यास नकार देत गोती. त्यामुळे मी रात्रीचं ठरवलं की, सकाळी हिने माझं ऐकलं नाही तर तिची हत्या करीन. त्यानुसार सकाळी पत्नीने जवळ येण्यास नकार दिल्यानंतर त्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली.

मुलांना कोण सांभाळणार हा विचार करून त्यांना कालव्यात फेकलं

पत्नीची हत्या केल्यानंतर तो मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. पत्नीनंतर मुलांना कोण सांभाळणार हा विचार करून त्याने तीनही मुलांना जिवंतपणे कालव्यात फेकून दिलं. या तिघांमध्ये 15 वर्षांची हर्षिता नावाची मुलगीदेखील होती.

स्थानिकांनी पोलिसांना दिली सूचना

या घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. यानंतर पोलिसांनी पप्पूला अटक केली आणि कालव्यातून मुलांचा शोध सुरू केला.

Post a Comment

0 Comments