-->

Ads

सोनू, तुझ्यावर भरोसा नाय का? 13 जणांसोबत केले लग्न; धुळ्यात 14 व्या लग्नाची सुरू होती तयारी!

 सोनू उर्फ पुजा शिंदे नावाच्या या तरुणीने आणि तिच्या टोळीने 13 जणांशी लग्न करण्याचे नाटक करून लाखो रुपयांना लुटले


    नंदुरबार, 24 मे: लग्न लावण्याच्या (wedding) बहाण्याने नवरा मुलाकडच्या मंडळीना गंडा घालून फसवणाऱ्या सोनू उर्फ पूजा शिंदे (Sonu-pooja Shinde) टोळीला नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या शहादा पोलिसांना (Shada Police) जेरबंद करण्यात यश आले आहे. मंदाणा येथील युवकासोबत लग्न करुन आठच दिवसांच्या आत ही नवरी धुळे (Dhule) जिल्ह्यातल्या बेटावद येथे दुसऱ्याशी लगीन थाटत असतानाच पोलिसांनी सापळा रचून या संपूर्ण टोळीला अटक केली आहे.

    मुळ हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सोनू उर्फ पुजा शिंदे हिचा विवाह नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मंदाणे गावच्या एका युवकासोबत झाला होता. औरंगबादच्या एका दलालामार्फत मंदाण्याच्या नवरा मुलाकडच्या मंडळींनी 1 लाख 30 हजारांची रक्कम नवरी सोनू उर्फ पुजा शिंदे हिच्या परिवारास दिली होती.05 मे रोजी यांच्या विवाह झाला आणि दहाच दिवसांच्या आत म्हणजे 15 मे रोजी ही नवरी मुलगी पहाटे घरातील रोकड व दागिने घेवून पोबारा केला.

    त्यानंतर मंदाणे येथील भुषण सैदाणे याने मंदाणे येथे याबाबत फिर्याद दिली होती. दोन दिवसांपूर्वी भुषणला धुळे जिल्ह्यातल्या बेटावद येथील नातलगाचा फोन आला. तुझ्या बायको सारखी दिसणाऱ्या एका युवतीचा बेटावद येथील कपिलेश्वर मंदीरावर लग्न असल्याचे त्याला सांगण्यात आले.

    यानंतर त्यांने संबंधित माहिती शहादा पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पोलिसांनी बेटावद येथे जावून तपास केला असता नुकताच लग्न झालेली मंडळी पळावद गावात लग्नात स्नेह भोजनाचा आनंद घेत असल्याचे समजले. या माहितीवरुन पोलिसांनी या ठिकाणी जावून सोनू उर्फ पुजा शिंदे, तिची आई वंदना राजू शिंदे, रवींद्र गवबा गोपाळ, योगेश संजय साठे, विक्की राजेश कांबळे या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.


    या युवतीने बेटावद येथूनही लग्नासाठी 50 हजार घेतल्याच समोर आले आहे. या सोनू उर्फ पुजा शिंदेच्या टोळीची चौकशी केली असता अशा प्रकारे 13 लग्न करुन नवरदेवा डच्या मडळींना गंडवल्याचे समोर आले आहे.  लग्न जुळवून देणाऱ्या इसमांसोबतच या टिमचे अन्य 02 सदस्य असे आणखीन तीन जण फरार असून शहादा पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करत आहे.

    Post a Comment

    0 Comments