Crime in Nagpur: किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर प्रियसीनं शारीरिक संबंध ठेवायला नकार (Lover refused to have sexual relation) दिल्यानं प्रियकराने तिची हत्या (Murder) केली आहे.
संबंधित आरोपीचं नाव मोहम्मद जाविद मोहम्मद युसूफ शेख (वय-38) असं असून तो मध्यप्रदेशातील बैतूल येथील रहिवासी आहे. तर 33 वर्षीय मृत प्रेयसीचं नाव सारिका शंकर पटेल असून ती सुदामनगरी अंबाझरी येथील रहिवासी आहे. आरोपीचं आणि मृत सारिका गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांचही लग्न झालं असून सारिका गेल्या तीन- चार वर्षांपासून आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती. तर आरोपी जाविदही आपल्या पत्नीला सोडून कामानिमित्त नागपूरात राहत होता. दरम्यान दोघांची ओळख होऊन गेल्या काही काळापासून दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तर आरोपी जाविद हा एका बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करत होता.
दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, 31 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास जेवन झाल्यानंतर दोघांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मृत सारिका तेथून रागाने इतर कामगारांसोबत गप्पा मारायला निघून गेली. त्यामुळे संतापलेल्या जाविदने महिल्या मजल्यावरून तिला विट फेकून मारली. यामुळे ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी जाविदने आरडाओरडा करत इतर कामागारांना मदतीसाठी बोलावलं आणि सारिका इमारतीवरून पडली असल्याचा बनाव रचला.
घटना सीसीटीव्हीत कैद
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट येऊन पाहणी केली असता, अनेक गोष्टी संशयास्पद आढळल्या. तसेच आरोपी जाविदच्या बोलण्यामध्येही विसंगती आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेतला असता, आरोपी जाविद इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून विट फेकून मारताना निदर्शनास आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी जाविदला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.
0 Comments