-->

Ads

Maharashtra SSC, HSC Exams 2021: | दहावी-बारावी परीक्षा पुढे ढकलल्या, मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

 दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. Maharashtra SSC HSC Exams


मुंबई: दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्याबाबत चर्चा झाली. कोरोना रुग्णसंख्या पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात, असं मत बैठकीत मांडण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   (Maharashtra Education Minsiter Varsha Gaikwad meeting with cm Uddhav Thackeray on SSC and HSC exam issue may exams postpone)

10 वी 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

दहावी बारावीच्या परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळे पुढे ढकलण्याची मागणी बैठकीत करण्यात आली होती. तर, काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसनं दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यावा, अशी मागणी केली होती.

परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मोठा निर्णय

राज्यात रविवारी 63 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. परीक्षा जवळ येत असताना राज्य सरकारनं निर्णय न घेतल्यानं विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रस्तावित लॉकडाऊनचा निर्णय पाहता राज्य सरकार दहावी बारावी परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारनं या परिस्थितीचा विचार करुन दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. दहावीची परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे. तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस नियोजित आहे.

मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा

दहावीची परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे. तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस नियोजित आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

Post a Comment

0 Comments