-->

Ads

Maharashtra lockdown कसा लागू करायचा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महत्त्वाची बैठक सुरू

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.


    मुंबई, 03 एप्रिल : राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे लॉकडाऊन (Maharashtra lockdown ) लागू करण्याचा निर्णय अटळ आहे. पण तो लागू कसा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक बोलावली आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, मीनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध या पर्यांयावर चर्चा होत आहे. नागरिकांचं अर्थचक्र न थांबता काही उपाय योजना करता येतील का ? कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने निर्बंध लावण्यात यावेत, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

    वृत्तपत्रांचे संपादक, जेष्ठ पत्रकार, व्यायामशाळांचे संचालक, मल्टिप्लेक्स मालक आणि नाट्य निर्माता संस्थेचे प्रतिनिधी यांच्याशी मुख्यमंत्री व्हिडीओ काॉन्फरसद्वारे चर्चा करत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री काय सुवर्णमध्य काढतायत याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.


    विशेष म्हणजे, 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आणि लॉकडाऊन लागू करण्याबद्दल इशारा दिला. 'तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली. मार्चच्या आधीच कोरोनाच्या राक्षसाने अक्राळविक्राळ रुप धारण केलं. त्यातच आता कोरोनाचा नवा अवतार. कोरोना वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतो आहे, आपली परीक्षा पाहतो आहे.  अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलेला आहे. काही देशांमध्ये हळूहळू लॉकडाऊन शिथील केले आहेत, लॉकडाऊन हा खूप घातक आहे, हे मला माहिती आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही, तर दुसरा उपाय काही असेल तर सांगा.  लॉकडाऊन नाही पण लॉकडाऊनचा इशारा. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. एक-दोन दिवसांत चर्चा करून निर्णय घेईन, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

    Post a Comment

    0 Comments