प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60) यांच्या आत्महत्या प्रकरणी आता एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मराठे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.
याप्रकरणी दीप्ती सरोज काळे (रा. बाबधन) व निलेश उमेश शेलार (रा. कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बळवंत मराठे यांच्या पत्नी निना मराठे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
0 Comments