-->

Ads

वालदेवी धरणात बुडालेल्या सर्व मुलांचे मृतदेह काढण्यात पथकाला यश मृतात पाच मुली व एका मुलाचा समावेश


            एकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरणवर  गेलेल्या शहरातील सिंहस्थनगर , मोरवाडी सिडको परिसरातील नऊ जणांपैकी सहा जण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यातील एका मुलीचा मृतदेह हाती लागला असून , अन्य पाच जणांचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरू होता. या घटनेत सुदैवाने तीन बचावले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शहरातील सिंहस्थनगर , मोरवाडी , वंजारभवन , पाथर्डी फाटा परिसरातील हिम्मत चौधरी वय वर्षे १6 , समाधान वाकळे , प्रदीप जाधव , सना वंजीर मनियार वय वर्ष 16 , आरती भालेराव वय वर्ष 22 , नाजिया वजीर मनियार वय वर्षे 19 , खुशी वजीर मणियार वय वर्ष 10 ज्योती कमी वय वर्ष 16 , व सोनी गामे वय वर्ष 12 हे सर्व दहा ते 22 वयोगटातील मुले- मुली सोनी गमे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरण परिसरात शुक्रवारी दुपारी गेले होते. त्यांनी सोबत केकही नेला होता. यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात एकाचा पाय घसरल्याने पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी इतरांनीही पाण्यात उड्या मारल्या. मात्र त्यातील आरती भालेराव , हिम्मत चौधरी , नाजिया मनियार , खुशी मणियार , ज्योती गमे व सोनी गमे हे सहा जण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले , तर समाधान वाकळे व प्रदीप जाधव राहणार सिंहस्थनगर , सेंट लॉरेन्स शाळेजवळ आणि सना नजीर मणियार , राहणार टोयाटो शोरूम मागे पाथर्डी फाटा हे तिघे जण सुदैवाने बचावले. या घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर वाडीवर्ह पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. यावेळी पाण्यातून आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तरण्या पाच जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. याच वेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक सचिन पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले , तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बचाव कार्य स्वतः पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील व सहकारी कर्मचारी सोनवणे , नवले , मराठी , चौधरी सहभागी झाले होते. कोरोनामुळे सर्व हॉटेल , तसेच अन्य ठिकाणी बंद असल्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट वालदेवी नदीवर गेलेल्या मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवस जीवावर बेतला.  या घटनेने सिन्हस्त नगर परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान , रिक्षा चालकामुळे नऊ जणांपैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान अंधारात शोधकार्यात अडथळे येत असल्याने रात्री उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले. आज सकाळी पुन्हा शोध कार्य चालू करण्यात आले असता सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वांचे मृतदेह हाती लागले आहेत या सर्वांचे मृतदेह जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून नासिक येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले .

Post a Comment

0 Comments