मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात शनिवारी ४९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने राज्याची स्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे.
राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल. दरम्यान, मुंबईच्या लोकलसेवेबाबत काय निर्णय होणार याकडे सामान्य मुंबईकरांचे लक्ष लागले होते.
वीकेंड लॉकडाऊन वगळता सामन्यांना लोकलने प्रवास करण्यात येणार आहे. मात्र, फक्त आसनक्षमते एवढ्याच प्रवाशांना प्रवास करण्यात येणार आहे. तर, वीकेंड लॉकडाऊनचे निर्बंधातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. प्रवास करताना सर्वांना मास्क घालणे बंधनकारक असेल. याबाबत सविस्तर नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल.
वीकेंड लॉकडाऊन कसा असेल ?
शुक्रवार 9 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून सोमवार 12 एप्रिल सकाळी सात वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन करण्यात येईल. केवळ अत्यावश्यक सेवा आणि परिवहन सेवा सुरु राहतील. याबाबत लवकरच सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येईल.
0 Comments