मागच्या वर्षापेक्षा 14 टक्के जास्त रक्कम वसूल
उस्मान शाह, अंबरनाथ
गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनचा धुमाकूळ असताना देखील अंबरनाथ नगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीच्या बाबतीत विक्रम गाठला आहे. सन 2020 - 21 साठी एकूण 35 कोटी 64 लाखा पेक्षा जास्त वसुली झाली असून मागच्या वर्षापेक्षा ही वसुली 14 टक्के जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या आदेशानुसार कर अधीक्षक नरेंद्र संख्ये आणि प्रशांत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अमोल मानकर, सीताराम तेली, अरुण काठवटे, सुनील मगरे, शशिकांत भालेराव, प्रभाकर खापेकर, आदीमुलम बाबू आदींसह कर विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन यावर्षी विक्रमी कर वसुली केली आहे.
0 Comments