-->

Ads

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती

कैलास काकफळे या रुग्णाची शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

भोकरदन तालुक्यातील पारध येथील घटना


           जालना जिल्ह्यातील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.कैलास काकफळे असं आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव असून ते रेणुकाई पिंपळगाव गावचे रहिवासी आहेत.त्यांच्या आत्महत्येमागील ठोस कारण समोर आलं नसलं तरी आजाराला कंटाळून कैलास काकफळे यांनी आत्महत्त्या केल्याची चर्चा आहे.४ दिवसांपूर्वी कैलास काकफळे यांनी अँटीजन टेस्ट केली होती.या चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले होते.आज सकाळच्या सुमारास पारध शिवारात त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Post a Comment

0 Comments