आपण दररोज पितोय ते दूध योग्य तर आहे ना ? कारण सोलापुरात सर्रास दुधात भेसळ करण्याचा प्रकार समोर आला आहे,
उत्तम दर्जाच्या दुधाची खात्री पटल्याशिवाय दूध खरेदी करताना विचार व्हावा एवढंच
दूध माणसाच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू...
आपल्या दिवसाची सुरुवातच दुधापासून होते,
मात्र आपण दररोज जे दूध घेतो ते पिण्यायोग्य आहे का ?
कारण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भोईंजेमध्ये दुधात भेसळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी भोइंजेतील ज्ञानेश्वर कराळे यांच्या मालकीच्या अक्षय डेअरीवर धाड टाकली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला..
खाद्यतेल आणि व्हे. परमिटचा वापर करून ड्युब्लिकेट दुधाची निर्मिती केली जाते.
या धाडीमध्ये 23.4 किलो सूर्यफूल तेल,
456 किलो व्हे.परमिट पावडर जप्त करण्यात आलं आहे.
सोलापूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून तब्बल 640 लिटर भेसळयुक्त दूध गटारीत फेकून दिलंय..
आणि संबंधितांवर कारवाई करून गुन्हे ही नोंद करण्यात आले आहेत.
त्यामुळं तुम्ही पीत असलेलं दूध 100% शुद्ध असेल याची खात्री करूनच खरेदी करा...
0 Comments