-->

Ads

हदगांव- नांदेड अवैध रेती वाहतुकीवर हदगाव तालुका प्रशासनाला लस सापडेना


जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हदगाव तालुक्यातील एकाही रिती घाटाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेली नसतांनाही हदगाव शहरात मात्र अवैध रेतीचा गोरखधंदा खुलेआम चालू असून प्रशासनाला यावर उपाय म्हणून कोणतेही कायदेशीर कार्यवाहीचे लसीकरण होत नसल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव- नांदेड

 परवानगी नसताना हदगाव शहरात मागील काही दिवसापासून अवैध रेतीवाहतुक मोठ्या प्रमाणावर चालू आहे.रोज हायवा -टिपर , ट्रॅक्टरने दिवस - रात्र रेलचेल चालु आहे . महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून एक दोन नाममात्र कार्यवाही केल्या आसल्या तरी प्रशासनाच्या या थातुरमातुर कार्यवाहीवर रेती माफियांनी आपला गोरखधंदा थांबवायला तयार नाहीत . यामुळे प्रशासनाचा रेतीमाफियांना बाहेरून पाठींबा आहे का ?असा सवाल तालुक्यात उपस्थित करित आहेत . अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष पथक नेमवुन गस्त घालत सुरू केली असली तरी हे पथक रेतीमाफियाशी मिलिभगत करीत अर्थपूर्ण जुळवणूक केले असल्याने हा उपाय कुचकामी ठरत आहे . एक दोन गाड्या पकडत पोकळ कार्यवाही करून मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाला गोरखधंदा दिसत नाही का ? की कार्यवाहीचे बळ उरले नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे पाहवास मिळत आहे.यामुळे अवैधरित्या चालणा - या रेतीच्या धंद्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलास फटका बसला आहे . जिल्हाधिकारी , व पोलिस अधीक्षकांनी कठोर कार्यावाही करून सबंधित रेतीमाफियांवर रेतीमाफियांना अभय देणार्यांना एकादी चांगली लसीकरण करावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतुन धरत आहे . हदगावचे उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर शिस्तबद्ध अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत मात्र रेतीच्या विषयावर कार्यवाहीस ते धजावत नसल्याने सध्यातरी रबरी शिक्का बनले आहेत.

चौकट

अवैद्य रेतीची वाहतुकीबद्दल अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास कार्यवाही करू - जिल्हाधिकारी डॉक्‍टर विपिन इटनकर

जिल्ह्यात लॉकडाउन लागू करण्यात येत आला आहे . या कालावधीत प्रशासनातील सर्व विभागाने पालन केले पाहिजे लॉकडाउनची संधी साधून वाळु माफिया विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी जो विभाग कमी पडेल , त्यांच्या विरुद्ध देखील कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर म्हणाले .

Post a Comment

0 Comments