अंबरनाथच्या कोविड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
उस्मान शाह, अंबरनाथ
अंबरनाथच्या आनंदनगर परिसरातील विजय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या कोव्हीड रुग्णालयात बिलासाठी महिलेचा मृतदेह देण्यास नकार देण्यात आला, सकाळी ७ वाजता मृत्यू होऊन ही दुपारपर्यंत नातेवाईकांना मृतदेह दिला नाही, याचा जाब विचारण्यासाठी स्थानिक मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार रुग्णालयात गेले असता पत्रकारांना चित्रीकरण करण्यापासून रोखत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
रुग्णालयातील काही महिला व पुरुष स्टाफकडून मृताचे नातेवाईक, मनसे कार्यकर्ते व टीव्ही 9 चे निनाद करमरकर आणि लोकशाहीचे मयुरेश जाधव यांना धक्काबुक्की झाली आणि प्रतिकार केला असता मारहाण झाली आहे. या घटनेचा शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहे.
0 Comments