स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महागाव तालुक्यातील तहसीलदार यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन करून शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोफत माती परीक्षण करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसाठी वाढत असल्याने जमिनीतील नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे
व आपल्या जमिनीची गरज ओळखून त्याला खताची मात्रा देणे ही शास्त्रशुद्ध पद्धत असते पण दुर्दैवाने आपल्याकडे माती परीक्षणकडे शेतकरी दुर्लक्ष करतात व वाटेल त्या पद्धतीने वारेमाप अनाठाई फर्टीलायझर रासायनिक खताचा वापर शेतामध्ये केल्या जातो फर्टीलायझर रासायनिक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून उत्पादनावरील खर्च वाढलेला आहे गत तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला सामोरे जातोय व माती परीक्षणाचे केंद्र हे जिल्हा पातळीवर असून शेतकऱ्यांना ते आर्थिक दृष्ट्या न परवडणारे आहे असल्यामुळे शेतकरी माती परीक्षण आला आर्थिक विवंचनेत मुळे पाठ फिरवतात , आपल्या जमिनीतील खता ची लागणारी योग्य मात्रा माहीत झाल्यास शेतकरी योग्य त्या पद्धतीने रासायनिक फर्टीलायझर चा वापर करून आपल्या उत्पादनावरील खर्च कमी करेल त्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण करून द्यावी
अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष शिवानंद राठोड यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत केली आहे यावेळी त्यांच्यासोबत विक्रम राठोड दीपक हाडोळे , सचिन उबाळे , प्रमोद अडकिने , covid-19 च्या कोरोना पार्श्वभूमीवर कमी संख्येत कार्यकर्ते उपस्थित राहून जिल्हा व राज्य प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून हे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना महागाव यांना आज सादर करण्यात आले आहे राज्य शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा असा आशावाद यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला
0 Comments