-->

Ads

विवाहितेला भेटायला आला प्रियकर; सासरच्यांनी अर्धनग्न अवस्थेत खांबाला बांधून केली जबरी मारहाण

 विवाहित प्रेयसीला (Married Lover) भेटायला आलेल्या एका तरुणाची सासरच्या मंडळींनी अमानुष (Family member beat young man) मारहाण केली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.


आग्रा, 04 एप्रिल: विवाहित प्रेयसीला भेटायला आलेल्या एका तरुणाची सासरच्या मंडळींनी अमानुष मारहाण केली आहे. प्रेयसीच्या सासरच्या लोकांनी या तरुणाला अर्धनग्न करून खांबाला बांधून जबरी मारहाण केली आहे. प्रियकराला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित सूनेनं आपल्याच सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आतापर्यत एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल (Beating Viral Video) होतं आहे.

पीडित युवक शनिवारी दुपारी आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील सिकंदरा परिसरात आला होता. त्यावेळी विवाहितेच्या सासरच्या लोकांनी दोघांना पाहिलं. आपली सून अनोळखी युवकासोबत पाहून सासरच्या लोकांनी त्याला पकडलं आणि मारहाण केली. हे प्रकरण एवढ्यावरचं मिटलं नाही, तर आरोपींनी संबंधित युवकाला अर्धनग्न करून एका विद्युत खांबाला बांधूनही जबरी मारहाण केली आहे. या मारहाणीत पीडित युवकाला शरीरावर अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

गावातीलच काही लोकांनी संबंधित घटनेची माहिती सिकंदरा पोलीस ठाण्याला कळवली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित युवकाची सुटका केली आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सूनेनं सासू- सासरा आणि इतर नातेवाईंकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यातील मुख्य आरोपीला अटक केली असून अद्याप चार जणांचा शोध घेतला जात आहे.

पीडित युवक आणि विवाहित युवती एकमेकांचे मित्र असून गेल्या काही वर्षांपासून त्यांची ओळख आहे. शनिवारी तो आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला आला होता. त्यानंतर त्याला झालेल्या बेदम मारहाणीत युवकाला अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments