एका अपार्टमेंटमध्ये पाच वर्षाखालील
आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी मुलांच्या आईला (Mother Kills Children) ताब्यात घेतलं आहे.
लॉस एंजलिस पोलिसांनी सांगितलं, की मुलांची आजी जेव्हा कामावरुन घरी परतली तेव्हा तिनं अपार्टमेंटमध्ये मुलांचे मृतदेह पाहिले. यावेळी मुलांची आई बेपत्ता होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, या मुलांचा मृत्यू चाकूनं हल्ला केल्यानं झाला आहे. मात्र, याप्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. पोलिसांनी सांगितलं, की आम्ही तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत, की या मुलांची हत्या का केली गेली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कारिलो आपल्या कारनं जात होती. मात्र, बेकर्सफील्ड परिसरात तिचं कोणासोबत तरी भांडण झालं. यानंतर तिनं आपली कार तिथेच सोडली आणि दुसऱ्याची कार हिसकावून घेत ती फरार झाली. कारिलो हिला बेकर्सफील्डपासून तब्बल 322 किलोमीटर दूर असलेल्या तुलारे काउंटीच्या पोंडेरोसा परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं, की सध्या या महिलेनं हत्या केला असल्याचा संशय आहे. आम्ही वेगवेगळ्या बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहोत. या हत्येमध्ये आणखी कोणी सामील होतं का? याचा तपास करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
0 Comments