जोगेश्वरी च्या बेहराम बाग परिसरात एक पाच वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीने बलात्कार केल्याची घटना काल संध्याकाळी घडली आहे.आरोपी चे नाव सुनील सुखराम गुप्ता असे असून तो पीडित मुलीच्या घर मालकाचा मुलगा आहे.पीडित मुलीचे कुटुंब हे आरोपी च्या घरातील पोट माळ्यावर भाड्याने रहाते.काल संध्याकाळी नेहमी प्रमाणे ती आरोपी च्या घरी टिव्ही पाहण्यास गेली असता आरोपीने दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला.मुलीने थोड्याच वेळात घरी जाऊन घडलेला प्रकार तिच्या आईला सांगीतला.पीडित मुलीच्या कुटुंबाने या बाबत ओशीवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी आरोपी सुनील ला बेड्या ठोकल्या. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
0 Comments