काम बंद झाल्याने आपला संसाराचा गाडा चालवायचा कसा अशा विवंचनेत असताना त्यांची ओळख अरुणाशी झाली.
वसई पूर्वेकडील रेंज नाका येथे मुंबईतून वसईत येवून मुली पुरवत असल्याची खबर अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रकाश निकम यांना माहीती मिळाली होती. अरुणा चौहान नावाची वेश्या पैसे घेवून मुली पुरवते. निकम यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांना दिली. पोलीस उपआयुक्त प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे सहाय्यक फौजदार प्रकाश निकम पोलीस हवालदार बापु पवार, सुनिता कांटेला ,पोलीस नाईक रोशन किणी , महेंद्र शेट्ये ,विशाल कांबळे , पुनम जगदाळे , काजल पाटील,राजेश निवृत्ती पदमने यांच्या पथकाने सापळा रचून अरुणाला अटक केली.
शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असल्याने त्या तयार झाल्या होत्या. मुंबईत राहणाऱ्या वेश्या दलाल महिलेने फोनवर ग्राहकांशी संपर्क साधून ग्राहकांच्या मागणी नुसार, मुली पुरवण्याचे काम करीत असल्याची बातमी प्रकाश निकम यांना मिळताच त्यांनी वारीष्टांच्या मार्गदशर्नाखाली एका सामाजिक संस्थेची मदत घेत एका बोगस गिहाईकाला वेश्या अरुणा हिला फोन करून मुलीची मागणी करायला सांगितले. अरुणाने एका मुलीचे 2000 रुपये सांगितले. त्यानंतर वसईच्या फादरवाडी येथील कृष्णा उडपी हॉटेलकडे भेटण्यासाठी बोलावले. अरुणा 2 मुलींना घेवून रिक्षाततून आल्या आणि कृष्णा उडप्पी येथे आल्या असता आणलेल्या दोन मुलींपैकी एका मुलीची निवड करण्यास सांगितली.
त्याप्रमाणे बोगस गिहाईकाने एका मुलीस पसंत केले व ठरल्याप्रमाणे व्यवहाराचे 2000 रुपये अरुणाकडे दिले. आणि खात्री झाल्यानंतर अनैतिक वाहतूक शाखेचे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दलाल अरुणा व 2 पीडित मुलींना ताब्यात घेतले. अरुणा ही मुंबई सायन हून त्या दोन पीडित मुलीना घेवून आली होती. दलाल महिला ही फोनवरून गिऱ्हाईकांना संपर्क करून त्यांच्या मागणीनुसार, मुली पुरवत असल्याची कबुली तिने पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा करून 2 पीडित मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.पुढील तपास वालीव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद करोडीवाल करीत आहेत.
0 Comments